सिंधुदुर्ग - उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार ट्विटरवरून किंवा जाहीर प्रतिक्रियांमधून खिल्ली उडवणाऱ्या राणे सुपुत्रांमुळे भाजप आणि शिंदे गटात खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Deepak Kesarkar ) आता दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून माजी खासदार निलेश राणे भडकले आहेत. त्यांनी थेट केसरकर यांची लायकी काढली आहे.
दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी सुनावले - एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचे शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. ( Nilesh Rane ) शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे, नितेश राणे यांनी ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावी. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असे वक्तव्य केसरकरांनी केले होते. मात्र, दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावले आहे. दरम्यान, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, अस निलेश राणे म्हणाले आहेत.