महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsainik Attack Case Sindhudurg : शिवसैनिकावर खुनी हल्ला प्रकरणी चौघे ताब्यात, सतीश सावंतांनी हल्ला घडविल्याचा निलेश राणेंचा आरोप - पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

कणकवलीतील शिवसैनिक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात ( Shivsainik Attack Case Sindhudurg ) आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले ( Four Accuse arrested )आहे. दुसरीकडे राजकारणही तापले असून, हा हल्ला सतीश सावंत यांनीच घडवून आणल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane Alleges Satish Sawant ) यांनी केला आहे.

निलेश राणे
निलेश राणे

By

Published : Dec 19, 2021, 10:15 AM IST

सिंधुदुर्ग - कणकवलीत घडलेली मारहाणीची घटना ( Shivsainik Attack Case Sindhudurg ) ही सतीश सावंत यांच्या विकृत मनोवृत्तीचे कारस्थान आहे, असा सनसनाटी पलटवार माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी ( Nilesh Rane Alleges Satish Sawant ) केला. सतीश सावंत यांचा पीए, ड्रॉयव्हर आणि जिल्हा बँकेचे लँड लाईन डिटेल्स पोलिसांनी जाहीर करावेत, मग सत्य बाहेर येईल, असे राणे म्हणाले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले ( Four Accuse arrested ) असून त्यांची चौकशी सुरू आहे.

शिवसैनिकावर खुनी हल्ला प्रकरणी चौघे ताब्यात, सतीश सावंतांनी हल्ला घडविल्याचा निलेश राणेंचा आरोप

जिल्हा बँक अध्यक्षांवर निलेश राणेंचे आरोप

सतीश सावंत ( Satish Sawant Sindhudurg ) हा अत्यंत कारस्थानी माणूस आहे. कारस्थाने घडवून आणायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा त्यांचा धंदा आम्हाला माहिती आहे. कणकवलीची घटना हे त्यांचेच कारस्थान आहे. हे कारस्थान कसे घडले, कुठे घडले, कोणी घडवले याची माहिती घेण्यासाठी सतीश सावंत, त्यांचे स्वीय सहायक, जिल्हा बँकेची लँडलाईन यांचे तपशील पोलिसांनी तपासावेत, असे निलेश राणे यांनी सांगितले.

खापर राणेंच्या नावावर फोडायचे, असा हा डाव आहे

निवडणूक तोंडावर आली म्हणून हे असले प्रकार घडवले जात आहेत. ते घडवणारा माणूस सतीश सावंतच आहे. असले काहीतरी उद्योग करायचे आणि खापर राणेंच्या नावावर फोडायचे, असा हा डाव आहे. गेल्या सात वर्षात शिवसेनेची सत्ता आहे. दीपक केसरकर गृहराज्यमंत्री होते. आज ठाकरे सरकार सत्तेत आहे तेव्हा, राणेंच्या विरोधात एकसुद्धा केस का सापडली नाही? सात वर्षात एकही वादग्रस्त घटना का घडली नाही? असे सवाल निलेश राणे यांनी केले. घडलेल्या घटनेसंदर्भात आम्ही योग्य तो कायदेशीर क्रम घेऊ. आमचे वकील न्यायालयात या प्रकरणाची चिरफाड करतीलच, पोलिसांनीही आपले काम जबाबदारीने करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चौघे जण ताब्यात

कणकवलीतील शिवसैनिक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर शनिवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ( Santosh Parab Attack Case ) पोलिसांनी केलेल्या नाकाबंदित फोंडाघाट चेक पोस्टवर पकडलेली कार व त्यातील चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या चौघाही तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून, नेमका त्यांनी हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला? याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच या प्रकरणामागे राजकीय कारण आहे की अन्य काही? याबाबतही पोलिस तपास सुरू आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान याप्रकरणी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ( IPS Rajendra Dabhade ) हे जातीनिशी लक्ष घालत असून, कणकवली डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह निवडक पोलिसांच्या उपस्थितीत या चारही संशयितांची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details