पणजी -गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी उत्तर गोव्यातील हरमल येथील एका घरावर छापा टाकून, बारा लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. शेडलॉक लुईस कामा (वय 32 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
बार लाखांच्या अमलीपदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक - Panaji Latest News
गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी उत्तर गोव्यातील हरमल येथील एका घरावर छापा टाकून, बारा लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. शेडलॉक लुईस कामा (वय 32 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
12 लाखांचे अमलीपदार्थ जप्त
उत्तर गोव्यातील हरमलमध्ये अमली पदारर्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना अमलीपदार्थ आढळून आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी नारजेरियन व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडे 11.806 ग्रँम एलसीडी लिक्विड आणि 52.6 ग्रॅम गांजा आढळून आला आहे. त्याची किंमत अंदाजे 12 लाखांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.