सिंधुदुर्ग - सचिन वाझेंना मनसूख हीरेन प्रकरणात अटक झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात एनआयए निपक्षपणे चौकशी करेल, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल, ते समोर येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शंभर अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराधावर अन्याय होता कामा नये, याची काळजी एनआयए आणि एटीएस या दोन्ही टीम घेतील, अशी खात्री असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
विवेकबुद्धी जागृत ठेवून कारवाई आवश्यक -
सचिन वाझे यांचा 17 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने बळी दिला होता. त्याप्रमाणे त्याची पुनरावृत्ती आता होते आहे. असे त्यांचे स्वतःचे मत आहे. त्यामुळे नक्कीच यामधे काळबेर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनआयएने आपली सदसद् विवेकबुद्धी जागृत ठेवून याबाबत कारवाई करणे आवश्यक असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका -