महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane Supports Nitesh Rane : नारायण राणेंकडून आमदार नितेश राणे यांच्या ‘म्याऊ.. म्याऊ’चे समर्थन

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मंत्री आदित्य ठाकरे चालले असताना आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी ‘म्याऊ… म्याऊ’ असा आवाज काढत त्यांना चिडवले ( Nitesh Rane Teased Aaditya Thackeray ) होते. नितेश यांच्या या कृतीचे मंत्री नारायण राणे यांनी समर्थन केले ( Narayan Rane Supports Nitesh Rane ) आहे. मांजरीचा आवाज काढण्यात एवढे आक्षेपार्ह काय आहे? असा सवाल करत नारायण राणे यांनी नितेश यांची बाजू घेतली आहे.

नारायण राणे
नारायण राणे

By

Published : Dec 28, 2021, 5:38 PM IST

Updated : Dec 28, 2021, 9:26 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane Criticized MVA Government ) यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केलेत. त्यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या पायरीवर नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजाचे समर्थन ( Narayan Rane Supports Nitesh Rane ) केले. तसेच कणकवली प्रकरणात फिर्यादीला साधे खरचटले असताना, 307 कलम लावून नितेश राणेंना ( MLA Nitesh Rane ) निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचे ते म्हणाले.

नारायण राणेंकडून आमदार नितेश राणे यांच्या ‘म्याऊ.. म्याऊ’चे समर्थन

मांजरीचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध?

विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलनावेळी मांजरीचा आवाज काढल्‍याच्या मुद्दयावरून आमदार नीतेश राणे यांच्यावर सत्ताधारी पक्षाचे नेते आरोप करत आहेत. पण मांजरीचा आवाज काढण्यात एवढे आक्षेपार्ह काय आहे. पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांचा आवाज तर मांजरीचा नाही. तसंच आदित्‍य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध आहे का? असा प्रश्‍न राणे यांनी आज केला. सत्तेचा दुरुपयोग म्हणजेच प्रशासनाचा दुरुपयोग आहे. एका आमदारासाठी राज्यभरचे पोलीस इथे आलेत. इथे कोणी दहशतवादी आलेत का? हल्ला करणाऱ्यांमध्ये नितेश राणे होते का? छातीवर उजव्या बाजूला खरचटल्यावर ‘307’ लागतो, हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांची वागणूक चुकीची आहे, असेही ते म्हणाले.

साधं खरचटल्याची घटना घडली असताना एवढे वातावरण का?

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक येतात. राज्यभरातील पोलिस इथे तैनात केले जातात. इथे एवढं असं काय घडलंय की, प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला जातोय? असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज उपस्थित केला. तसेच एखाद्या व्यक्तीला साधं खरचटलं असेल तर 307 सारखं कलम लावलं जातं आहे. तसेच आमदार नीतेश राणे यांचा मारहाणीत सहभाग नसताना त्यांना आरोपी केलं जातं ही बाब चुकीची आहे. सिधुदुर्गात असं काय घडलं आहे की, राज्यातील पत्रकार, राज्याचे पोलिस संचालक, अतिरिक्त संचालक इथे येत आहेत. तसंच राज्यभरातील पोलिस यंत्रणा सिंधुदुर्गात का आणण्यात आली आहे. साधं खचटल्यासारखी घटना असताना एवढी वातावरण निर्मिती का केली जातेय? हा सगळा सत्तेचा दुरूपयोग आहे. कणकवलीत मारहाणीची घटना झाली. त्यात नीतेश राणेंचा सहभाग नव्हता. मात्र जिल्हा बँक निवडणुकीच्या ( Sindhudurg District Bank Election ) पार्श्वभूमीवर त्यांना डांबून ठेवण्यासाठी 307 कमलाचा वापर होतोय असेही राणे म्हणाले.

नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का?
यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार नितेश राणे आता कुठे आहेत? असा प्रश्न विचारला असता ते कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिले. कोकणात वादळ, पूर येऊन गेले. तेव्हा अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) आले नाहीत. मात्र यावेळी आले. परंतु जाहीर केलेले पैसे पोहोचलेत का, याची निदान माहिती करून त्यांनी यायला हवं होतं. लघु पाटबंधारेसाठी 13 कोटीची प्रोविजन असताना साडेसहा कोटी पाठवले. पण एकही टेंडर गेले नाही. या सरकारबद्दल जनतेला आस्था नाही. एका पदासाठी भांडणारे जनतेला काय न्याय देणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.

Last Updated : Dec 28, 2021, 9:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details