सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.
कणकवलीतुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा सुरू झाला. देवगड, मालवण, सावंतवाडीत राणेंनी या दौऱ्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आदी नेते दौऱ्यात सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा-प्रतिदिन १० लाख वसुलीचे पुणे मनपाचे टार्गेट; व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध
खासदार संजय राऊत यांच्यावर टीका
राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. राणे म्हणाले, की संजय राऊत हे राज्यसभेत भेटल्यानंतर वेलडन म्हणतात. बाहेर जाऊन टीका का करतो असे विचारले असता हे राजकारण असल्याचे सांगतात. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत की पवारांसोबत हा प्रश्न आहे. राणेजी मी तुमच्या सोबत असे त्यांनी म्हटल्यावर मग पवार साहेबांचे काय असे विचारले. रोज त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. ते काय बोलण्याच्या लायकीचेदेखील नाहीत, असे राणे म्हणाले.
हेही वाचा-Video : उगाच पलटन वाढू नका, दोनच अपत्यांवर थांबा - अजित पवार