महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane on Nitesh Ranes arrest : नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत - Narayan Rane on possibility of Nitesh Ranes arrest

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या हत्येप्रकरणी पोलीस हे संदेश उर्फ गोट्या सावंत यांना अटक ( Police attempt to arrest Sandesh Sawant ) करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होणार असे संकेत ( Signs of MLA Nitesh Rane Arrest ) आता मिळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

नारायण राणे
नारायण राणे

By

Published : Dec 27, 2021, 12:32 AM IST

Updated : Dec 27, 2021, 12:46 AM IST

सिंधुदुर्ग - राणे आणि शिवसेनेतील वादाने ( Clashes between Narayan Rane and Shivesena ) जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कणकवली येथे 18 डिसेंबर रोजी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाला ( Attack on Shivesena leader Santosh Parab ) होता. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीला बोलाविल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ येथील आयोजित पत्रकार ( Narayan Rane press in Kudal ) परिषदेत दिली आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणा पोलीस हे संदेश उर्फ गोट्या सावंत यांना अटक ( Police attempt to arrest Sandesh Sawant ) करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होणार असे संकेत ( Signs of MLA Nitesh Rane Arrest ) आता मिळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

नारायण राणे यांची पत्रकार परिषद

हेही वाचा-Ajit Pawar In Ratnagiri : कुणी कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय.. अजित पवारांनी राणे, मलिकांना सुनावले

पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याची राणेंची टीका-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येणार आहे. हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने महाविकास आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणे म्हणाले, की कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांचा संबंध लावण्यात येत आहे. पोलीस अधिकाराचा गैरवापर करत आहेत. नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. राज्यातील आघाडी सरकार हे बळाचा व अधिकाराचा गैरवापर करून नाहक प्रकरणात नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिसांनी लक्षात ठेवा, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये, असा इशारा राणे ( Narayan Rane warning to Police in Sidhudurg ) यांनी दिला.

हेही वाचा-Ajit Pawar Car Driven By LPC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य, पाहा VIDEO



अटकसत्र थांबत नसल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढू

संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला ( Sachin Sapute arrest ) अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते याला सिंधुदूर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जनतेला हे सरकार काही देऊ शकले नाही. शेतकरी मजूर कामगारांना काही देऊ शकले नाही. दहा वर्ष महाराष्ट्राला मागे नेले. कुठलीही कुठलाही संबंध नसताना अशी अटकसत्र सरकारने बंद करावीत. पोलीस सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करीत भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात केस टाकत आहे. अटक सत्र थांबत नसल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे व भ्रष्टाचार उजेडात आणू, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

हेही वाचा-MLA Nitesh Rane Alleges on Government : संतोष परब हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न - आमदार राणे

Last Updated : Dec 27, 2021, 12:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details