सिंधुदुर्ग - अनेक दिवसांपासून नारायण राणे त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर याला मुहूर्त मिळालेला आहे. येत्या १५ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहीती खुद्द नारायण राणे यांनी दिली आहे. त्यामुळे राणे याचवेळी औपचारिकपणे भाजपवासी देखील होतील.
नारायण राणेंचा भाजपप्रवेश कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मात्र, विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली तरी त्यांचा प्रवेश झाला नाही. यातच त्यांचे पुत्र नितेश यांना कणकवलीत कोणताही गाजावाजा न करता आणि घाई-घाईत भाजप प्रवेश देण्यात आला. तसेच त्यांना कणकवलीतून उमेदवारीही दिली गेली.