सिंधुदुर्ग- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग- रत्नागिरीसह सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये महापूर आला. या महापुरात घरे, संसार, दुभती जनावरे, गोठे आदी उध्वस्त झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयाची हानी झाली असून गोरगरीब सर्वसामान्य माणसे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. कै. नारायण उर्फ नाना मांजरेकर ट्रस्टच्या माध्यमातूनही उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आपला दातृत्वपणा समाजासमोर ठेवला आहे.
नाना मांजरेकर ट्रस्टची पूरग्रस्तांना मदत; १० लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द - कै. नाना मांजरेकर ट्रस्ट
कै. नाना मांजरेकर ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच या मदतीच्या रकमेचा १० लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कै. नाना मांजरेकर ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच या मदतीच्या रकमेचा १० लाखाचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, महादेव जानकर आदी मंत्री व सहकारी उपस्थित होते.
कोकणातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. त्यामध्ये आतापर्यंतच्या मदतीत उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी 10 लाख रुपयांचा धनादेश देत सर्वात मोठी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. या मदतीमुळे पूरग्रस्तांना सरकारच्या माध्यमातून हातभार लागणार आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांचे आभार मानले आहेत.