सिंधुदुर्ग - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तत्परतेने पत्रकार परिषदेत घेतली. सुशांतसिंह आणि त्याच्या सेक्रेटरीची हत्याच झाली, अशी ठाम भूमिका राणे यांनी घेतली आहे. दुसऱ्यांच्या मृत्यूबाबत नारायण राणे बोलत आहेत. मात्र, स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाच्या हत्येबाबत त्यांनी अजूनही चकार शब्दही उच्चारला नाही. त्यांचा भाऊ अंकुश राणेंची हत्या कोणी केली? हे राणेंनी सांगावे, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.
स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली त्याबाबत काही बोलायचे नाही. पण सुशांतसिंहच्या मृत्यूवर टाहो फोडून रडायचे काम राणे करत आहेत. 2005पासून कणकवलीमध्ये किती हत्या झाल्या त्याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करत आहोत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.