सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आजपासून मान्सून सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी तळकोकणात मात्र मान्सूनची प्रतीक्षा होती. अखेर आजपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
मिरग ओतलो.. सिंधुदुर्गात बळीराजाची प्रतीक्षा संपली, वादळी वाऱ्यासह मान्सून दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून मान्सून सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी तळकोकणात मात्र मान्सूनची प्रतीक्षा होती.
मृगाच्या धारांनी वातावरणात आणि नागरिकांत आनंद पेरला -
सिंधुदुर्गात आज मिरगाचे जोरदार आगमन झाले आहे. मृगाच्या धारांनी वातावरणात आणि नागरिकांत आनंद पेरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. आज पावसाने तब्बल दीड तास जोरदार हजेरी लावली. या पावसाने येथील शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बळीराजा सध्या भात पेरणीच्या गुंतलेला दिसत आहे.
जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता -
दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे १० व ११ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच १२ जून ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. परंतु त्याआधीच दोन दिवस सिंधुदुर्गात मृगाचा पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला आता जोर चढणार आहे. तसेच लोकांची जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी आणि शेतीच्या कामासाठी लगबग दिसून येत आहे.