महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा - MNS Sindhudurg opposes electricity bill hike

राज्यात वीजबिल माफी व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. हाच मुद्दा पकडून वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

MNS Sindhudurg opposes electricity bill hike
सिंधुदुर्गात वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक

By

Published : Nov 26, 2020, 7:02 PM IST

सिंधुदुर्ग -राज्यात वीजबिल माफी व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. हाच मुद्दा पकडून वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली.

माहिती देताना मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर

वीजबिलात 100 युनिटपर्यंत माफी देणार, असे आश्वासन देऊन ऐन दिवाळीत वीजबिलात माफी मिळणार नाही, अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. ही जनतेची फसवणूक असल्याने या विरोधात मनसेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्ट्याक पद्धतीने आंदोलन करणार, असा इशारा उपरकर यांनी दिला.

हेही वाचा -सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित

ABOUT THE AUTHOR

...view details