सिंधुदुर्ग -मुंबई-गोवा महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी कुडाळ प्रांतिधिकारी यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या मार्फत लाखो रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एका प्रकल्पग्रस्ताने आमदारन वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आमदार नाईन यांनी बँक व प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारला. तसेच प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना खडेबोल सुनावले.
जमिन मोबदल्यासाठी कुडाळ प्रांताधिकाऱ्यांची लाखोंची मागणी? आमदार वैभव नाईकांनी सुनावले खडेबोल
मुंबई-गोवा महामार्गासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहोत. त्या जमिनीच्या मोबदल्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी बँक कर्मचाऱ्यांमार्फत लाखो रुपये मागितले असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. तसेच प्रांताधिकाऱ्यांबाबत जनतेतून तक्रारी येत होत्या. आता मोबाईल कॉल रेकॉर्डमधून देखील ही बाब समोर आली असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहोत. त्या जमिनीच्या मोबदल्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी बँक कर्मचाऱ्यांमार्फत लाखो रुपये मागितले असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. तसेच प्रांताधिकाऱ्यांबाबत जनतेतून तक्रारी येत होत्या. आता मोबाईल कॉल रेकॉर्डमधून देखील ही बाब समोर आली असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. प्रांताधिकारी म्हणून तुम्ही चौकशी कार. तुमच्या कार्यालयाचे नाव सांगत एका अधिकाऱ्याने पैसे घ्यायला सांगितले, असे समोर आले आहे. असे नसेल तर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार द्या, असे नाईक यांना खरमाळे याना सुनावले.
दरम्यान, काहीही त्रुटी दाखवून पैसे जमाकरण्यासाठी जमीन मालकांकडून पैशाची मागणी प्रांताधिकारी कार्यालयातून होत असल्याची माहिती मिळाली होती. याची तक्रार पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याने सदर जमीन मालकाचे पैसे देण्यासाठी प्रांतांधिकाऱ्यांनी आपल्याकरवी पाच लाख रुपये मागितले, या संभाषणाचा कॉल रेकॉर्डही आपल्यासमोर आला असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.