महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने 14 दिव्यांग बांधवांना स्कूटरचे वाटप - सिंधुदुर्ग लेटेस्ट बातमी

नाईक यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 निधीतून मतदारसंघातील 14 दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरचे वाटप केले. आज कुडाळ शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्कूटरचे वितरण करण्यात आले.

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने 14 दिव्यांग बांधवांना स्कूटरचे वाटप
आमदार वैभव नाईक यांच्यावतीने 14 दिव्यांग बांधवांना स्कूटरचे वाटप

By

Published : May 15, 2020, 5:36 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोनाच्या संकटाची सर्वांना चिंता लागून राहिली असतानाच दिव्यांग बांधवांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. आजकाल दुचाकी खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे असतानाच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिव्यांग बांधवांना एक अनोखी भेट दिली. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील 14 दिव्यांग बांधवांना स्कूटरचे वाटप करण्यात आले.

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने 14 दिव्यांग बांधवांना स्कूटरचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून राज्यात आमदार बच्चू कडू व नाईक यांनीच हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी दिली आहे. नाईक यांनी संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत कामगिरी केली आहे. यामुळे दिव्यांग बांधवांचादेखील आंनद गगनात मावेनासा झाला. नाईक यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 निधीतून मतदारसंघातील 14 दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कूटरचे वाटप केले. आज कुडाळ शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्कूटरचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, जि .प. सदस्य अमरसेन सावंत उपस्थित होते.

या १४ लोकांना मिळालीये स्कूटर -

शरद जोशी (मालवण), सुजाता वायंगणकर (पावशी), सिताराम कुंदेकर (कुंदे), चंद्रसेन धुरी (राठीवडे), संजय साळकर (हडी), रामचंद्र वेंगुर्लेकर (ओरोस), राघवेंद्र मुळीक (मसुरे), अरूण पाटकर (वडाचापाट), विठोबा सूद (घोडगे), प्रीतम माधव (माणगांव), शिवराम सावंत (माणगांव), तुषार सावंत (भरणी), व्यंकटेश ठाकूर (मसुरे) व अक्षय भोसले (मेढा मालवण) अशाप्रकारे या 14 जणांना स्कूटर वाटप करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details