सिंधुदुर्ग - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. युती आणि आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी आपणास पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच. नितेश राणेंनी एक आभाराची पोस्ट ट्विटवर पोस्ट केली आहे.
आमदार म्हणून माझा कार्यकाळ आज संपला.. माझ्या जनतेचे मी आभार मानतो, मला त्यांची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली! माझ्या जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या, त्या मी या ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तसेच मला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचे देखील आभार! अशा आशयाचे ट्विट त्यांनी पोस्ट केले आहे. नितेश राणे हे कणकवली देवगड मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर आमदारकी मिळवली होती. मात्र आता त्यांचे वडील खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नितेश राणे आताची निवडणूक भाजपकडून लढवणार की महाराष्ट्र स्वाभिमान या स्वत:च्या पक्षाकडून लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा -मी अजून म्हातारा झालेलो नाही, माझी ताकद काय आहे, हे मी दाखवून देईल- शरद पवार