महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 7, 2022, 9:48 AM IST

Updated : Feb 17, 2022, 10:26 AM IST

ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case :आमदार नितेश राणे यांच्या नशिबी धक्क्यांची मालिका संपेना, जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे गेली

आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या नशिबी धक्क्यांची मालिका संपण्याचे काय नाव घेत नाही. राणे यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवार) सुनावणी होणार होती. परंतु काल लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar passes away) झाल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेली.

MLA Nitesh Rane
MLA Nitesh Rane

सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांच्या नशिबी धक्क्यांची मालिका काही संपायचे नाव घेताना दिसत नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर (Monday declared a public holiday) करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज देखील बंद आहे. परिणामी आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर होणारी सोमवारची सुनावणी पुढे गेली आहे. नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत असून ते सध्या जिल्हा रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत आहेत.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane Arrested ) यांना संतोष परब हल्ला प्रकरणी शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाली. त्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई शनिवारी दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज केला.

बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला (Santosh Parab Attack Case) आहे. त्या अर्जावर या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी आ. राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. तसेच विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता.

दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले या पार्श्वभूमीवर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे न्यायालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी जिल्हा न्यायालयात होऊ शकत नाही. ही सुनावणी आता मंगळवारी होण्याची शक्यता आहे. यामुळे नितेश राणे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मात्र मंगळवारी या अर्जावर सुनावणी होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार नितेश राणे हे 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत असून त्यांची तब्येत बिघडली असल्यामुळे सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Feb 17, 2022, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details