सिंधुदुर्ग- पीएमसी बँक घोटाळ्यात सामान्य जनतेचे पैसे अडकले आहेत. या घोटाळ्यात शिवसेनेच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होतात. खंबाटामधील कामगारांचे पैसे खाण्याचा आरोप येथील स्थानिक खासदार विनायक राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत यांच्यावर होत आहे. तसाच हा संचयनी घोटाळा आहे. यात शिवसेनेच्या नेत्यांची नावे आहेत. कोकणी जनतेने ज्या विश्वासाने पैसे गुंतवलेले त्यांना त्यांचे आजपर्यंत पैसे परत भेटलेले नाहीत. आजही संचयनीतील आरोपी फरार दाखविले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संचयणीत फसवणूक केलेल्यांना अटक व्हावी आणि जनतेचे पैसे लवकरात लवकर मिळावेत, अशी आपली मागणी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सांगितले.
संचयनीत सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
संचयनीत सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. पीएमसी बँक घोटाळा, खंबाटा घोटाळा या प्रमाणेच संचयनीचाही घोटाळा आहे. याबाबत मला राजकीय आरोप करायचे नाहीत. पण, या घोटाळ्यात शिवसेनेचेच पुढारी गुंतले आहेत हे सर्वज्ञात आहे. संचयनी घोटाळ्याची तक्रार ठेवीदारांनी जशी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे केली तशीच माहिती देशाचे प्रधानमंत्री आणि अर्थ मंत्र्यांना पत्रपाठवून दिली आहे. त्यानुसार केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुरागजी ठाकूर यांनी कारवाईचे आदेश आणि आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले आहे.