सिंधुदुर्ग- ठाकरे सरकारने कोकणी माणसाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. चक्रीवादळात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे अत्यंत तुटपुंजी मदत तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना हे सरकार देत आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्य सरकारने कोकणात केलेली मदत म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा, अशी असल्याचेही ते म्हणाले. तर सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांच्या भाऊ भागीदारीत ऑक्सिजन प्लांट लावून संकटातही पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
ठाकरे सरकारने कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडले
निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईचा अध्यादेश सरकारने जाहीर केला आहे. याबाबत बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले, जी नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे ती मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या खर्चालाही पुरणार नाही. हेक्टरी 50 हजार म्हणजे हापूसच्या झाडाला 500 रुपये, सुपारीच्या झाडाला 250 रुपये, कुणाची टपरी पडली असेल तर 10 हजार रुपये हे जे आकडा आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्चातरी एवढा आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला आहे. जी काही मदत जाहीर केली ते पाहता मग हे पंचनामे आमची थट्टा करण्यासाठी झाले का, म्हणजे एका बाजूला कोट्यधींचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार केंद्राकडे 2 हजार कोटी रुपये मागयचे आणि स्वतःच्या खिशातून फक्त 250 कोटी रुपये द्यायचे, असाशी ठाकरे सरकार आहे. ज्याने कोकणी माणसाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्र्यांच्या भावाचा भागीदारीत ऑक्सिजन प्लांट