सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन होते. इतरत्र कोठेही फिरलेले नाहीत, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. त्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. मी आणि माझे सहकारी तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन सर्वांची योग्य पद्धतीने काळजी घेत आहेत. त्याचप्रमाणे गावचे सरपंच, पदाधिकारी आणि दक्षता समिती गावातील व्यवस्था योग्य पद्धतीने सांभाळत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये असे, आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
"कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी जनतेने घाबरून जाऊ नये" - सिंधुदुर्ग कोविड १९
कणकवली तालुक्यात 6, वैभववाडी नाधवडे येथे 1 आणि मालवण येथे 1 अशा 8 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओद्वारे जनतेला घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले आहे.
कणकवली तालुक्यात 6, वैभववाडी नाधवडे येथे 1 आणि मालवण येथे 1 अशा 8 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओद्वारे जनतेला घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले आहे. कणकवली तालुक्यातील डांबरी येथील पॉझिटिव्ह आढळलेले चारही रुग्ण गावात फक्त एकच रात्र राहिले. व्यवस्थापन समितीने त्यांना योग्यवेळी फोंडाघाट मराठे कॉलेजमध्ये क्वारंटाईन कक्षात नेऊन ठेवले. त्यामुळे गावातील जनतेने भीती बाळगू नये. कणकवली शहरातील ढालकाठी येथे जे दोन रुग्ण आढळले आहेत ते मुंबईहून आल्यापासून परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रमातील क्वारंनटाईन कक्षात राहिलेले आहेत. तेही इतरांच्या संपर्कात आलेले नाहीत, त्यामुळे शहरातील नागरिकांनीही घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे नितेश राणे म्हणाले.
नाधवडे येथे आढळलेला एक रुग्ण हा एकच दिवस त्या ठिकाणच्या शाळेत थांबलेला होता नंतर तो उपचारांसाठी ओरोस येथे नेण्यात आला. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काळजी करण्याचे कारण नाही. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात आलेले नाहीत. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. दर्जेदार आरोग्य सेवा प्रत्येकाला देण्याबाबत आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, कोणी काळजी करू नये असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.