सिंधुदुर्ग- मालवण शहरालगत असलेल्या किनारपट्टी गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शारीरिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ऐन दिवाळी दिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा सुन्न झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सायंकाळी उशिरापर्यंत तीनही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांच्यावर पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर हे मालवणात दाखल झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
फेसबुकवरुन झाली ओळख..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर भूषण शरद माडये (वय २२, रा. तारकर्ली-मालवण) याच्यासोबत पीडितेचे व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलणे सुरू होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मुलीचे आईवडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, पीडिता भूषण सोबत काही अंतरावर असलेल्या किनारपट्टी गावात फिरायला गेले.
दोघांनी केले अत्याचार..