सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन- चार दिवसात पूर्ण होतील. मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. त्यामुळे आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
तौक्ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्थाना आठवड्याभरात मदत वाटप होणार - विजय वडेट्टीवार - तौक्ते परिणाम
गतवर्षीच्या वादळात सरकारने निकष बदलून मदत दिली. यावेळीही कोणालाही नाराज न करता मदत देणार असून याबाबत कॅबिनेटमध्ये विषय उपस्थित केला जाईल. मालवण, वेंगुर्ला, देवगड या तालुक्यामध्ये वादळाचा मोठा फटका बसला आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. कोकणवासीयांच्या मागे खंबीर उभे राहण्याची भूमिका मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाची आहे.
'मुख्यमंत्री कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे'
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, की गतवर्षीच्या वादळात सरकारने निकष बदलून मदत दिली. यावेळीही कोणालाही नाराज न करता मदत देणार असून याबाबत कॅबिनेटमध्ये विषय उपस्थित केला जाईल. मालवण, वेंगुर्ला, देवगड या तालुक्यामध्ये वादळाचा मोठा फटका बसला आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. कोकणवासीयांच्या मागे खंबीर उभे राहण्याची भूमिका मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाची आहे. त्यामुळे मदतीत हात आखडता घेतला जाणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मृत खलाशांच्या वारसांना दिले मदतीचे धनादेश
तौक्ते चक्रीवादळात देवगड समुद्रात दोन नौका बुडाल्या. या अपघातात ४ खलाशी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या खलाशांच्या वारसांना शासनाच्या वतीने मदत करण्यात आली. त्या मदतीचे चेक महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते यांच्या वारसदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे आदी उपस्थित होते.