महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री उदय सामंतांचा अंकुश नाही'

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. स्वतःच्या पक्षातील आमदारानेच अधिकाऱ्यावर अशा प्रकारे भ्रष्टचाराचे आरोप करणे म्हणजे पालकमंत्र्यांचा जिल्हा प्रशासनावर वाचक नसल्याचे दिसून येत आहे. येथिल शिवसेनेत सावळा गोंधळ आहे.

minister uday samant
'जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री उदय सामंतांचा अंकुश नाही'

By

Published : Jul 7, 2020, 7:33 AM IST

Updated : Jul 7, 2020, 7:47 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री उदय सामंत यांचा अंकुश राहिलेला नाही. शिवसेनेचा आमदारच अधिकाऱ्यांवर भ्रष्टचाराचा आरोप करत आहे. यातून पालकमंत्री निष्प्रभ आहेत, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले.

'जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री उदय सामंतांचा अंकुश नाही'

कुडाळ प्रांताधिकारी वंदना करमाळे यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग बाधितांची नुकसान भरपाई देण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. स्वतःच्या पक्षातील आमदारानेच अधिकाऱ्यावर अशा प्रकारे भ्रष्टचाराचे आरोप करणे म्हणजे पालकमंत्र्यांचा जिल्हा प्रशासनावर वाचक नसल्याचे दिसून येत आहे. येथिल शिवसेनेत सावळा गोंधळ आहे. या आमदाराने अधिकाऱ्यांची व्हायरल क्लिप सर्वांसमोर आणली. हेच आमदार म्हणतात पास नसताना वाळू मुबलक प्रमाणात इकडे उपलब्ध होते. या भ्रष्ट कारभारावर पालकमंत्र्यांच्या अंकुश आहे की नाही असा प्रश्न यावेळी तेली यांनी विचारला.

जिल्ह्यात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांना अजूनही पुरेशे खात उपलब्ध झालेले नाही. गरज नसताना जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना जगने बेहाल झाले आहे. या सर्व प्रश्नांबाबत लॉकडाऊन आटोपल्यावर जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jul 7, 2020, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details