महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपला जागा दाखवली - मंत्री हसन मुश्रीफ - minister hasan mushrif in sindhudurg

आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला

minister hasan mushrif
हसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्री

By

Published : Dec 5, 2020, 8:45 PM IST

सिंधुदुर्ग - भाजपचा जो उन्माद होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

हसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्री

मुश्रीफ सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर आपलं मत मांडलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं

भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रणौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाबाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे. मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू दडवले. हा गेल्या एका वर्षातला थयथयाट पाहून लोकं कंटाळली होती. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

कामांची पोचपावती लोकांनी दिली

कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

हेही वाचा -दोन्ही 'राजे' भाजपाच्या प्रभावाखाली... मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास संभाजी ब्रिगेड आग्रही

ABOUT THE AUTHOR

...view details