महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2020, 4:39 PM IST

Updated : Aug 24, 2020, 5:11 PM IST

ETV Bharat / state

बीओटी तत्वावर कणकवली एसटी आगाराचे नूतनीकरण करणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

कणकवली एसटी आगार सुसज्ज असावे त्याचबरोबर एसटीला चांगले उत्पन्न मिळावे म्हणून या जागेचे बीओटी तत्वावर नूतनीकरण केले जाणार आहे. एसटीची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.

कणकवली एसटी आगाराचे नूतनीकरण
कणकवली एसटी आगाराचे नूतनीकरण

सिंधुदुर्ग - एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नव्या मार्गांचा अवलंब करण्याची गरज आहे. तेव्हा बीओटी तत्वावर कणकवली एसटी आगाराचे नूतनीकरण करणार असून हे आगार अत्याधुनिक बनवले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

बीओटी तत्वावर कणकवली एसटी आगाराचे नूतनीकरण

मंत्री अनिल परब यांनी कणकवली आगाराच्या जागेची आज(सोमवार) पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सुशांत नाईक, एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ आदी उपस्थित होते. कणकवली हे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. जिल्ह्यातील अनेक भागांना जोडणारे हे स्थानक आहे. हे आगार सुसज्ज असावे त्याचबरोबर एसटीला चांगले उत्पन्न मिळावे म्हणून या जागेचे बीओटी तत्वावर नूतनीकरण केले जाणार आहे. एसटीची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे, असेही अनिल परब म्हणाले.

या आगाराचे नूतनीकरण व्हावे अशी कणकवली स्थानिकांसोबतच शिवसेनेचे पदाधिकारी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, संजय पडते यांची मागणी होती. त्या अनुषंगाने आपण आज याठिकाणी पाहणी करून संबंधितांची बैठक घेतली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एसटीची ही सात एकर जागा आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात हा जिल्ह्यातील जनतेचा अधिकार आहे. त्याचबरोबर एसटीलाही चांगले उत्पन्न मिळाले पाहिजे हे आपलं धोरण असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Aug 24, 2020, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details