सिंधुदुर्ग- जिल्ह्यात धवलक्रांती घडवण्यासाठी जिल्हा दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन- तीन महिन्यांत 2 कोटींचा दुग्ध व्यवसाय प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी 1 एकर जागेची आवश्यकता असून जागेसाठी जिल्हा उत्पादक संघामार्फत कामधेनू ठेव योजना राबविली जाणार असल्याची माहीती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी दिली.
सिंधुदुर्गात लवकरच उभारला जाणार दुग्ध व्यवसाय प्रकल्प - सतीश सावंत - धवलक्रांती
जिल्ह्यात धवलक्रांती घडवण्यासाठी जिल्हा दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन- तीन महिन्यांत 2 कोटींचा दुग्ध व्यवसाय प्रकल्प उभारला जाणार आहे.
यावेळी सांवत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघ अवसायानात गेलेला असल्याने पुन्हा दूध उत्पादक संघ सुरू करणे थोडे अडचणीचे होते. अशा वेळी एम. के. गावडे यांनी पुढाकार घेत दूध उत्पादक संघाचे थकीत कर्ज फेडले. तसेच दूध उत्पादक संघाला अवसायानातून बाहेर काढले. त्यानंतर आता पुन्हा एम के गावडे यांच्या अध्यक्षते खाली दूध उत्पादक संघाची स्थापना करून आगामी काळात जिल्ह्यात दूध उत्पादक प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जेणेकरून येथील शेतकऱ्याला भविष्यात दुसऱ्या जिल्ह्यातील दूध संघावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी विश्वस्त प्रज्ञा परब, उषा पाटील देखील उपस्थित होत्या.