महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परप्रांतीय मजुरांना घरी पाठवण्यास सरकारची मंजुरी, आरोग्य प्रमाणपत्रासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात गर्दी - sindhudurg lock down news

लॉकडाऊनमुळे आपापल्या जिल्ह्यात तसेच राज्यात जाणारे येथे परप्रांतीय मजूर, प्रवासी, पर्यटक व विद्यार्थी अडकून पडले आहेत. काही अधिकारी-कर्मचारी सुट्टी असल्याने आपापल्या मूळगावी जाण्यास इच्छुक आहेत. अशा लोकांना त्यांचा जिल्हा तसेच राज्यात जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी कुदळ ग्रामीण रुग्णालयात रविवारी परप्रांतीय कामगारांनी फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी गर्दी केली होती.

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात परप्रांतीयांची गर्दी
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात परप्रांतीयांची गर्दी

By

Published : May 4, 2020, 12:22 PM IST

सिंधुदुर्ग -लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गात अडकलेल्यांना आपापल्या जिल्ह्यात व राज्यात पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर रविवारी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळविण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात परप्रांतियांनी गर्दी केली होती. परप्रांतियांसह अन्य जिल्ह्यात जाणारे काही नागरिक फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात आले होते. दिवसभरात तीनशेहून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे आपापल्या जिल्ह्यात तसेच राज्यात जाणारे येथे परप्रांतीय मजूर, प्रवासी, पर्यटक व विद्यार्थी अडकून पडले आहेत. काही अधिकारी-कर्मचारी सुट्टी असल्याने आपापल्या मूळगावी जाण्यास इच्छुक आहेत. अशा लोकांना त्यांचा जिल्हा तसेच राज्यात जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातून बाहेर जाणाऱ्या लोकांची यादी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लोकांची वैद्यकीय तपासणी करून सक्षम असणाऱ्यांनाच जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. अन्य जिल्हा व राज्यात जाणाऱ्या लोकांनी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी परप्रांतीय कामगारांनी फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी गर्दी केली होती. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या कामगारांचा भरणा जास्त होता. ते आपल्या कुटुंबियांसह रुग्णालयात दाखल झाले होते. येथून अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांनीही आरोग्य तपासणी करून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तीनशेहून अधिक जणांची तपासणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details