महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitesh Rane moved To Kolhapur : आमदार नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना - Hearing on bail application

आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना तपासणी आणि उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. तेथील सीपीआर रुग्णालयात जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखी नेण्यात येत असून ते रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसैनिक संतोष परब (Shiv Sainik Santosh Parab) यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील असलेले भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी (Hearing on bail application) होणार आहे.

Nitesh Rane moved Kolhapur :
नितेश राणे कोल्हापूरला हलवले

By

Published : Feb 7, 2022, 2:29 PM IST

Updated : Feb 7, 2022, 2:53 PM IST

सिंधुदुर्ग : कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, म्हणून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या वकिलांनी आमदार राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

नितेश राणे कोल्हापूरला हलवले

न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआ रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळ पासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते देखील कोल्हापुरात दाखल झाले आहेत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांन न्यायालयाने दि. 18 फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृतीचे कारण पुढे करुन राणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Last Updated : Feb 7, 2022, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details