मुंबई -मालाड येथे विवाहबाह्य संबंधाच्या वादातून एका महिलेची तिच्या पतीने १३ वर्षाच्या चिमुरडीसमोर निर्घृण हत्या ( Brutal murder of a woman ) केली. सोमवारी रात्री १०:३० च्या सुमारास मालवणी येथील झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली. शाब्दिक आणि शारिरीक अत्याचाराची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. ( Man kills wife suspecting her character held )
Malad Crime : १३ वर्षाच्या मुलासमोर पतीने केली पत्नीची हत्या - kills wife suspecting her character held
मालवणी येथे विवाहबाह्य संबंधाच्या वादातून एका महिलेची तिच्या पतीने १३ वर्षाच्या चिमुरडीसमोर निर्घृण हत्या ( Brutal murder of a woman) केली. ( Man kills wife suspecting her character held )
कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल -मालवणी पोलिसांचे (Malvani Police ) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव ( Senior Police Inspector Shekhar Bhalerao ) म्हणाले, आम्हाला कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मिळाली आणि आम्ही ताबडतोब निवासस्थानाकडे निघालो. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत संतप्त झालेल्या व्यक्तीने त्यांच्या मुलासमोरच पत्नीवर चाकूने वार केले होते. तर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या पत्नीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या पोटात एकदा आणि छातीत एकदा वार करण्यात आले, त्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असे अधिकारी म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, मुलाला आतापर्यंत त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठवण्यात आले आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.