महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकरमान्यांचा मालवणी भाषेतील व्हिडिओ व्हायरल - corona in sindhudurg

एरव्ही गावात चतुर्थी किंवा दिवाळीत रुबाबात गावी फिरणारे चाकरमानी सध्या गावच्या शाळेत, मंदिरात आणि गावातील घरात बंदिस्त आहेत. काहींना गैरसोयीमुळे उघड्यावर अंघोळ करावी लागते.

चाकरमान्यांचा मालवणी भाषेतील व्हिडिओ व्हायरल

By

Published : May 24, 2020, 5:21 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. काही भागात या चाकरमान्यांना स्वीकारले जात आहे, तर काही भागात चाकरमानी नको रे बाबा अशी स्थिती आहे. याच स्थितीवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या कोकणात व्हायरल होत आहे.

एक चाकरमानी चक्क मालवणी भाषेत आपल्या गाववाल्याना चांगल्याच शिव्या घालत आहे. एरव्ही चाकरमानी आल्यावर धावणारे तुम्ही आता आम्हाला रोगी समजून गावाबाहेर ठेवता, आमची मुंबई बरी असे म्हणत अगदी मालवणी भाषेत उद्धार करणाऱ्या या चाकरमान्यांचा व्हिडिओ सध्या मालवणी मुलखात जोरदार चर्चेचा विषय आहे.

एरव्ही गावात चतुर्थी किंवा दिवाळीत रुबाबात गावी फिरणारे चाकरमानी सध्या गावच्या शाळेत, मंदिरात आणि गावातील घरात बंदिस्त आहेत. काहींना गैरसोयीमुळे उघड्यावर अंघोळ करावी लागते. अशा अनेक अडचणीतून जाणारे चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details