महाराष्ट्र

maharashtra

देवगड आणि वैभववाडीत मुसळधार पाऊस, आंबा बागायतदारांचे नुकसान

By

Published : Apr 29, 2020, 10:57 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे देवगडमधील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे.

Loss of mango farmers due to torrential rains
देवगड आणि वैभवाडीत मुसळधार पाऊस, आंबा बागायदारांचे नुकसान

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज विविध ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. देवगडमध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी मार्गावर झाडे पडली होती.

देवगड आणि वैभवाडीत मुसळधार पाऊस, आंबा बागायदारांचे नुकसान

कोकणात अवेळी पडणाऱ्या पावसाने सध्या आंबा, काजू बागायदारांचे मोठे नुकसान केले आहे. आज जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. सध्या कोरोनाच्या संकटामुळे आधीच बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आंबा पडून असताना त्याला रेल्वे पार्सल ट्रेनने हात दिला होता. यामुळे बागतदारांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यात आता पावसामुळे बागायतदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details