महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोक अदालतीमध्ये ८८० प्रकरणे निकाली, दीड कोटी तडजोड पात्र रक्कम वसूल - लोक अदालत

एका प्रलंबित घटस्फोट खटल्यात तडजोड करण्यात यश आले. या दाम्पत्याला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी स्वखर्चाने संसारोपयोगी वस्तू देऊन पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या.

lok adalat
लोक अदालतीमध्ये ८८० प्रकरणे निकाली

By

Published : Feb 9, 2020, 6:21 PM IST

Updated : Feb 9, 2020, 11:36 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधून घेण्यात आलेल्या लोक अदालतीत शनिवारी 880 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. याप्रकरणी 1 कोटी 54 लाख 92 हजार 532 रुपये तडजोड पात्र रक्कम वसूल करण्यात आली.

लोक अदालतीमध्ये ८८० प्रकरणे निकाली, दीड कोटी तडजोड पात्र रक्कम वसूल

दरम्यान, एका प्रलंबित घटस्फोट खटल्यात तडजोड करण्यात यश आले आहे. या दाम्पत्याला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी स्वखर्चाने संसारोपयोगी वस्तू देऊन पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - 'दिल्ली मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास उशीर का? हा प्रकार धक्कादायक'

ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमधून शनिवारी लोक अदालत कार्यक्रम घेण्यात आला. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते यावेळी जिल्हा न्यायालयातील अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश 2 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम, जिल्हा न्यायाधीश 3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षाराणी पत्रावळे, मुख्य न्यायदंडाधिकरी ए. एम. फडतरे, न्यायालय व्यवस्थापक प्रशांत मालकर, विधी सेवा प्राधिकरण अधीक्षक टी. डी. पाटील आदी या कार्यक्रमात उपस्थित होते. जिल्हा बार असोसिएशनचेही या लोक अदालतीला सहकार्य लाभले.

हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

880 प्रकरणांचा निपटारा

जिल्हा व सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांमधून लोक अदालतीत दाखलपूर्व 6 हजार 498 तर न्यायालयाकडे दाखल होऊन निकालासाठी प्रलंबित असलेली 1 हजार 6 अशी एकूण 7 हजार 504 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामधून दाखलपूर्व 788 आणि प्रलंबितमधील 92 अशी एकूण 880 प्रकरणे निकाली काढण्यात आली.


दाखल पूर्व 788 प्रकरणे निकाली

या लोक अदालतीत पूर्नप्राप्तीची 5 हजार 193 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 613 निकाली निघाली असून 64 लाख 65 हजार 655 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. लाईट बिलासंबंधीच्या 319 पैकी 10 प्रकरणांमधून 18 हजार 523 रुपये वसूल करण्यात आले. यावेळी 2 दिवाणी प्रकरणातील एक निकाली काढण्यात आले. पाणी बिलाच्या 957 पैकी 164 प्रकरणांमधून 2 लाख 51 हजार 483 रुपये असे एकूण 67 लाख 35 हजार 662 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

हेही वाचा - सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या

न्यायालयामधील प्रलंबित 92 प्रकरणे निकाली

पूर्नप्राप्तीच्या 64 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा यावेळी निवाडा करण्यात आला. यातून 22 लाख 94 हजार 279 रूपये तडजोड पात्र रक्कम वसूल करण्यात आली. तर फौजदारी 37 प्रकरणांमधील 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली. भुसंपादनाच्या एका प्रकरणावरही यावेळी निर्णय झाला. यामधून 8 लाख 48 हजार 338 रूपये वसूल करण्यात आले. मोटार अपघाताच्या 33 प्रकरणांपैकी एका प्रकरणामधून 5 लाख 90 हजार वसूल करण्यात आले.

हेही वाचा - 'आय अ‌ॅम फॉर अल्लेप्पी' : केरळमधील पूरग्रस्तांना रामोजी समुहाने 121 घरे दिली बांधून

या लोक अदालतीत विवाह विषयक प्रकरणांचाही निर्वाळा करण्यात आला. यातील 77 पैकी 18 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून 4 लाख 25 हजार वसूल करण्यात आले. याशिवाय चेक बाऊन्सची 362 मधून 36 प्रकरणांवर निर्णय झाला असून यातून 16 लाख 88 हजार 547 रुपये वसूल करण्यात आले. अन्य दिवाणी प्रकरणातली 432 प्रकरणांमधून 30 प्रकरणांवर यावेळी निर्णय झाला. यातून 29 लाख 10 हजार 606 रुपये तडजोड रक्कम प्राप्त झाली.

तीन पॅनलने केला निवाडा

जिल्हा न्यायालयात तीन पॅनेलखाली दावे निकाली काढण्यात आले. जिल्हा न्यायाधीश 2 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखालील सदस्य अॅड. व्ही. आर पागम, जिल्हा न्यायाधीश 3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या नेतृत्वाखालील सदस्य अश्पाक शेख, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षाराणी पत्रावळे यांच्या नेतृत्वाखालील सदस्य अॅड. श्रीमती व्ही. व्ही. पांगम आदींनी काम पाहिले.

Last Updated : Feb 9, 2020, 11:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details