सिंधुदुर्ग - संवेदनशीलता ही केवळ मोठ्यांमध्येच जाणवते असे नाही ती वेळ काळानुसार छोट्यांमधूनही दिसून येते. देवगड हिंदळे येथील अंगणवाडीत शिकणारी विहा प्रविण तेली आणि तिची इयत्ता चौथीमध्ये शिकणारी मोठी बहीण दिव्या तेली या दोन बहिणींनी त्यांची बक्षिसाची व खाऊची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून एक आदर्श निर्माण केला आहे.
हिंदळे येथील चिमुकल्या बहिणींची अशीही मदत, मिळालेल्या बक्षिसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला - चिमुकल्या बहिणींची मदत
अंगणवाडीतील विहा प्रविण तेली या चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्याला मिळालेल्या बक्षिसाची व खाऊची रक्कम रुपये 500 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. तसेच तिची मोठी बहिण दिव्या प्रविण तेली या इयत्ता 4थी तील मुलीने विविध स्पर्धांमध्ये तिला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम रुपये 1 हजार 500 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती संकटात असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. शासनाने दिलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदळे, ता. देवगड येथील अंगणवाडीतील विहा प्रविण तेली या चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्याला मिळालेल्या बक्षिसाची व खाऊची रक्कम रूपये 500 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. तसेच तिची मोठी बहिण दिव्या प्रविण तेली या इयत्ता 4थी तील मुलीने विविध स्पर्धांमध्ये तिला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम रूपये 1 हजार 500 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.
आपल्या मुलांनी दाखवलेल्या ह्या संवेदनशीलतेबद्दल त्यांच्या आईवडीलांनी व कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या दानशूरपणाचे परिसरात कौतुक होत आहे. या कठीण प्रसंगी प्रशासनाला खारीचा वाटा का होईना पण मदत करावी असे आवाहनही केले जात आहे.