सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील घोणसरी गावात गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात मोठा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाले आहेत. मात्र, हातभट्टीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
सिंधुदुर्गात गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा, दारूचा मोठा साठा जप्त - Sindhudurg district news
कणकवली तालुक्यातील घोणसरी गावात गावाठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 550 लिटरहून अधिकची दारू जप्त केली आहे.
कणकवली तालुक्यातील घोणसरीच्या नदीकिनारच्या जंगलात हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या छाप्यात 550 लिटरहून अधिक गावठी हातभट्टीची दारू आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी हातभट्टी लावण्याचे साहित्य उध्वस्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांना ऊत आला असून हे धंदे रोखण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
हेही वाचा -शरद पवार यांचा आत्मचरित्रात एक आणि अंमलबजावणीत दुसरा चेहरा; भाजपाचा आरोप