सिंधुदुर्ग - माकड तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अत्यंत चांगल्याप्रकारे काम करत आहे. मणिपालची तात्पुरत्या स्वरुपाची लॅब सुरू करण्याचा आपण विचार करत असून तशी आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री सामंत यांनी माकड तापाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्गला भेट दिली आणि साथ रोगाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.
सिंधुदुर्गात माकड तापाच्या निदानासाठी लॅब उभारणार - पालकमंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात दोडामार्ग येथे दरवर्षी येणाऱ्या माकड तापाच्या साथीत रुग्णांचे तत्काळ निदान करता यावे यासाठी कायम स्वरूपी लॅब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे लॅबच्या कामाला थोडा उशीर झाला आहे. मात्र, हे काम लवकरच मार्गी लावले जाईल असेही पालकमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात दोडामार्ग येथे दरवर्षी येणाऱ्या माकड तापाच्या साथीत रुग्णांचे तत्काळ निदान करता यावे यासाठी कायम स्वरूपी लॅब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे लॅबच्या कामाला थोडा उशीर झाला आहे. मात्र, हे काम लवकरच मार्गी लावले जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले. दरम्यान, या दोन्ही तालुक्यातील ८ गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काय आहे माकड ताप आणि कुठून आला?
कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) म्हणजे माकड तापाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१६ मध्ये आपले हातपाय पसरले. सुरुवातीला दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे शेकडो माकडे मृतावस्थेत सापडली. यानंतर माकड ताप लोकांमध्ये पसरू लागला. देशात सर्वप्रथम १९५७ साली तत्कालीन म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात क्यासनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला. त्यामुळे त्याला कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD), असे म्हटले जाते. बाधित किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेल्या गोचीड किवा पिसवा माणसाला चावल्यास हा आजार पसरतो. या आजाराने २०१६ पासून आजवर जिल्ह्यात २४ लोकांचा बळी घेतला आहे. १२ दिवस अथवा अधिक काळ ताप असणे, डोक्याच्या पुढील भागात तीव्र वेदना, नाक, घसा, हिरडय़ांतून प्रसंगी रक्तस्राव, अतिसार, उलट्या, खोकला, मान, कंबरदुखी, विष्ठेतून रक्त पडणे, सांधेदुखी, अशक्तपणा, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्सचे प्रमाण खालावणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. या रोगावर अद्याप कोणताही निश्चित उपाय सापडलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या भारतीय विषाणू संस्थेने या माकड रोगाला 'पब्लिक हेल्थ अलर्ट' म्हणून घोषित केले आहे.