सिंधुदुर्ग - गणेशोत्सवासाठी आता काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. गावात येऊन क्वारंटाईन होण्यासाठी 7 ऑगस्टची मुदत संपली आहे. मात्र, शासनाने क्वारंटाईन कालावधी 10 दिवसांवर आणल्यामुळे ती मुदत 12 तारखेपर्यंत वाढली आहे. त्यामुळे अजूनही गणेशोत्सवासाठी गावाकडे येण्याचा चाकरमान्यांचा ओघ सुरुच आहे.
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा ओघ सुरुच
गणेशोत्सवासाठी आता काही दिवसांच्या कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यात सरकारने क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांवरुन 10 दिवसांवर आणल्याने 12 तारखेपर्यंत गावाकडे परतण्याची मुदत वाढली आहे. यामुळे अजुनही चारकामान्यांचा कोकणाकडे ओघ सुरुच आहे.
मुंबईकर चाकरमान्यांना रेल्वेचा पर्याय होता. मात्र, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्यामुळे सध्या सुरु असलेल्या रेल्वे गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत. तर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने चाकरमानी संघटनांच्या मागणीकडे फारसा लक्ष दिलेला नाही, परिणामी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणमार्गे रेल्वे नाही. त्यामुळे त्यांना खासगी बसेसवरच अवलंबून आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या चाकरमान्यांच्या कोरोना चाचणीच्या उपाययोजना खारेपाटण सीमेवर केली आहे. शासनाने क्वारंटाईनचा कालावधी आता 10 दिवस केला असले तरी अनेक गावांत 14 दिवसांचा आग्रह धरला जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, केंद्राकडून कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र, जे चाकरमानी येणार आहेत त्यांना त्रास होऊ नये, त्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची जबाबदारीही आमची आहे, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.