महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Notice To Narayan Rane : नारायण राणे हाजीर हो.. कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस

संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ( Nitesh Rane Bail Application ) न्यायालयात धाव घेतली आहे. असे असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद ( Narayan Rane Press Conference ) घेऊन नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का? असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरूनच कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे.

नारायण राणे
नारायण राणे

By

Published : Dec 29, 2021, 4:04 PM IST

Updated : Dec 29, 2021, 4:51 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांच्या माध्यमातून कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली ( Kankavli Police Notice To Narayan Rane )आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान आपल्याला नोटीस मिळाली का? याबाबत बोलण्यास नारायण राणे यांनी नकार दिला आहे.


नितेश राणेंचा शोध सुरु

सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब हल्ल्यातील ( Santosh Parab Attack Case ) आरोपी असलेले आमदार नितेश राणे यांच्या शोधात पोलीस आहेत. एकीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू ( Nitesh Rane Bail Application ) असतानाच, दुसरीकडे पोलीस नितेश राणेंच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यातच पत्रकारांनी नितेश राणे कुठे आहेत याबाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले ( Narayan Rane Press Conference ) असता केंद्रीय मंत्री राणे यांनी, 'नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे काय?' असा प्रतिसवाल पत्रकारांना केला होता. यावरून नितेश राणे कुठे आहेत हे केंद्रीय मंत्री राणेंना माहिती असण्याची शक्यता गृहीत धरून, कणकवली पोलिसांकडून नारायण राणे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

कर्मचाऱ्याने काढून टाकली नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांच्या माध्यमातून कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान ही नोटीस नारायण राणे यांनी स्वीकारली नसल्याने त्यांच्या बंगल्याच्या गेटवर कणकवली पोलिसांकडून चिटकवण्यात आली. मात्र राणे यांच्या कर्मचाऱ्याने ही नोटीस या ठिकाणाहून काढून टाकली.

पोलीस अधीक्षक कणकवलीत दाखल

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ( IPS Rajendra Dabhade ) , अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर हे कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत. ते कणकवली पोलिस ठाण्यात ( Kankavli Police Station ) ठाण मांडून आहेत. कणकवली शहरात पोलीस बंदोबस्तात ही वाढ करण्यात आली आहे.

राणेंनी नोटीस स्वीकारली नाही

दरम्यान, नारायण राणे यांनी पोलिसांची नोटीस स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे राणे हे दिलेल्या वेळेत देखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Last Updated : Dec 29, 2021, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details