महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची शासकीय कार जप्त - sameer nalawades car seized

लॉकडाऊन असतानाही विनाकारण वाहन फिरवताना एक आढळले. हे वाहन कणकवली नगराध्यक्षांचे होते. याबाबत विचारणा केली असता, त्यातील जावेद शेख याने पोलिसांशी हुज्जत घातली होती. पुढे जावेद याला पोलिसांनी ठाण्यात नेले, तेव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनीही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, जावेद याला अटकही झाली.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची शासकीय कार जप्त
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची शासकीय कार जप्त

By

Published : May 6, 2020, 9:01 AM IST

सिंधुदुर्ग -लॉकडाऊन असतानाही कणकावलीचे भाजप नगराध्यक्षांचे वाहन रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसले. विचारणा केल्यावर कारमधील जावेद शेख याने पोलिसांशी हमरीतुमरी केली. तसेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलिसांशी हुज्जत घातल्याबाबतच्या तीन आठवड्ंयापूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी नगराध्यक्षांसाठी असलेली टोयोटा इटॉस ही शासकीय कार कणकवली पोलिसांनी सोमवारी जप्त केली. संशयित आरोपींनी या गुन्ह्यासाठी याच कारचा वापर केला होता, अशी माहिती कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक बनकर यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे

हि घटना 16 एप्रिलला घडली हेती. याबाबत पोलीस नाईक आशिष जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, येथील पटकीदेवी मंदिर परिसरात सातत्याने फिरत असल्याबाबत जावेद शेख याला विचारणा करण्यात आली. यावेळी, त्याने पोलिसांशी हुज्जत घातली होती. पुढे जावेद याला पोलिसांनी ठाण्यात नेले, तेव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनीही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, जावेद याला अटकही झाली.

दरम्यान, संशयित कणकवली पोलीस ठाण्यात नगराध्यक्षांसाठी असलेल्या कारने दाखल झाले होते. म्हणूनच पोलिसांनी सोमवारी या वाहनाच्या चालकाशी संपर्क साधून ही कार (एमएच 07 एजी 3700) पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने कार तेथे आणल्यानंतर चालकाचाही जबाब घेण्यात आला. अखेरीस ही कार जप्त करण्यात आल्याचे बनकर यांनी सांगितले. दरम्यान, घटनेतील नगराध्यक्षांसह तीन संशयित आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्याबाबत विचारले असता, तपासाअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बनकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details