राणे समर्थक सतीश सावंतला शिवसेनेकडून एबी फॉर्म; नितेश राणेंना धक्का - satish sawant
कणकवली-देवगड मतदार संघात नितेश राणे हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. मात्र राणेंचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या तिकीटीवर निवडणूक लढणार आहे. नितेश राणेंना हा मोठा धक्का बसला आहे.
सिंधूदुर्ग- कणकवली देवगड मतदार संघामध्ये रंगतदार लढत पहायला मिळणार आहे. राज्यात सेना-भाजप युती असली तरी या मतदारसंघात सेना विरुद्ध भाजप असाच संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कारण येथून नितेश राणे भाजपचे उमेदवार असणार आहेत. तर पूर्वीचे राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत नितेश राणेंविरोधात मैदानात उतरत आहेत. त्यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याने ते शिवसेनेकडून लढतील. शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत नितेश राणे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध सेना अशी लढत कणकवली- देवगड मतदारसंघात पहायला मिळणार आहे.