सिंधुदुर्ग - कणकवली शहरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय गोरगरिबांची उपासमारी होऊ नये, यासाठी एक उपक्रम सुरू केला गेला आहे. या माध्यमातून दररोज १५० जणांना मोफत जेवण दिले जाते. हा उपक्रम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुरू केला. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 180 जणांनी या कमळ थाळीचा आस्वाद घेतला.
कणकवलीत "कमळ थाळी"ला उस्फुर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी १८० जणांनी घेतला लाभ - कणकवलीत "कमळ थाळी"ला उस्फुर्त प्रतिसाद
परप्रांतीय लॉकडाऊनमुळे जिल्हाभर अडकून पडले आहेत. त्यांच्या जेवणाचे अतोनात हाल होत आहेत. हे लक्षात येताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘कमळ थाळी’ च्या माध्यमातून मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. या कमल थाळीचा शुभारंभ शहरातील विद्यानगर भागातील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात करण्यात आला.
या उपक्रमबद्दल नितेश राणे आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कणकवली शहरात विविध व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आणि मोल मजूरी करणारे परप्रांतीय लॉकडाऊनमुळे जिल्हाभर अडकून पडले आहेत. त्यांच्या जेवणाचे अतोनात हाल होत आहेत. हे लक्षात येताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘कमळ थाळी’ च्या माध्यमातून मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. या कमल थाळीचा शुभारंभ शहरातील विद्यानगर भागातील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात करण्यात आला.
दुपारी 12 ते 2 या वेळेत शहर परिसरातील तब्बल 180 जणांना मोफत जेवण देण्यात आले. लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत कमळ थाळीचा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अनेक गरजूंनी लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात कमळ थाळीचा लाभ घेतला.