महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर नाणार रिफायनरीसह जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नियोजित जागेत - नितेश राणे - सिंधुदुर्ग नाणार रिफायणरी प्रकल्प

आम्ही विरोधी पक्षात असलो आणि सत्तेत संधी मिळाली नसली तरी देवगड कणकवली आणी वैभववाडी या तीनही शहर आणि तालुक्यांकडे विकासाचे व्हिजन ठेवून काम केले. देवगड तालुका अन्य तालुक्यांच्या तुलनेत गेल्या सहा वर्षांपूर्वी पर्यटनाच्या चर्चेत आणि पर्यटन विकासामध्ये मागे होता. मात्र, त्याला या भागाचा आमदार म्हणून पुढे आणण्यास काम केले आहे, असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

jaitapur atomic power project with nanar refinery at the planned site say bjp mla nitesh rane
नितेश राणे

By

Published : Oct 19, 2020, 10:31 PM IST

सिंधुदुर्ग -भारतीय जनता पक्षाला सत्तेची संधी मिळाली तर नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि मालवण वायंगणी येथील सी वर्ल्ड प्रकल्प नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजित जागेतच केले जातील, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोकणाचा कायापालट करणारे महत्वकांक्षी प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने गुंडाळून ठेवले आहेत. हे सर्व प्रकल्प सरकारने मार्गी लावल्यास येथील लोकांना आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. येथील लोकांचे दरडोई उतपन्नही वाढेल, असे मत यावेळी आमदार राणे यांनी मांडले.


देवगड कणकवली वैभववाडी या मतदार संघातील २६३ गावच्या जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीच्या पदासाठी मला संधी दिली. २३ ऑक्टोबरला आता सहा वर्ष पुर्ण होतील. आम्ही विरोधी पक्षात असलो आणि सत्तेत संधी मिळाली नसली तरी देवगड कणकवली आणी वैभववाडी या तीनही शहर आणि तालुक्यांकडे विकासाचे व्हिजन ठेवून काम केले. देवगड तालुका अन्य तालुक्यांच्या तुलनेत गेल्या सहा वर्षांपूर्वी पर्यटनाच्या चर्चेत आणि पर्यटन विकासामध्ये मागे होता. मात्र, त्याला या भागाचा आमदार म्हणून पुढे आणण्यास काम केले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

सरकार काय मदत करेल ही वाट न बघत बसता या तालुक्याच्या पर्यटनावर मी विशेष भर दिला. व्हॅक्स म्युझियम, कंटेनर सिनेमा, वाॅटर स्पोर्टस हे सुरू करण्याबरोबरच पंचतारांकित असलेला क्लब, महिंद्राचा हॉटेल प्रकल्प देवगडमध्ये आणत आहे. १६० एकरमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या पर्यटनावर आधारित प्रकल्पामुळे मोठ्या संख्येने या तालुक्यात पर्यटक येतील आणि मोठी रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. या तालुक्यात फळबागायती आणि शेतीलाही प्राधान्यक्रम असून पर्यटन विकासामुळे याही क्षेत्राला उभारी मिळणार आहे. तसा प्रयत्न आपण सातत्याने करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details