महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन - Sindhudurg district

सिंधुदुर्ग अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने मंगळवारी सिंधुदुर्गात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित असलेल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या.

सेविकांचे जेलभरो आंदोलन

By

Published : Feb 13, 2019, 10:19 AM IST

सिंधुदुर्ग -अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने मंगळवारी सिंधुदुर्गात जेलभरो आंदोलन करण्यात आले. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या. दरम्यान आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलकांकडून सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सेविकांचे जेलभरो आंदोलन

राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी जेलभरो आंदोलन छेडले आहे. सिंधुदुर्गातदेखील जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीला सिंधुदुर्ग ओरोस येथील रवळनाथ मंदिरात जिल्हाभरातून शेकडोच्या संख्येने आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकत्र जमल्या. त्यानंतर जमलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आपल्याला अटक करुन घेत जेलभरो आंदोलन केले.

सेविकांचे जेलभरो आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ व्हावी, गेल्या सात महिन्यापासून रखडलेले मानधन मिळावे, २०१५ पासूनचा प्रवासभत्ता त्वरित अदा व्हावा. या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान वेळोवेळी आंदोलन करुन सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कर्मचारी महिला चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details