महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : संसदीय अंदाज समितीकडून चिपी विमानतळाची पाहणी - chipi airport inspection sindhudurg news

या विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचा तिकीट काउंटरदेखील विमानतळावर सुरू झाले आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

chipi airport
चिपी विमानतळ

By

Published : Mar 1, 2021, 4:46 PM IST

Updated : Mar 1, 2021, 6:21 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज (सोमवारी) संसदीय अंदाज समितीचे सदस्य जिल्ह्यात दाखल झालेत. या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट डीजीसीआयचे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे.

चिपी विमानतळाची पाहणी

डीजीसीआयने अद्यापही परवानगी दिलेली नाही -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. अद्यापही या विमानतळाचा संलग्न रोड झालेला नाही. तसेच विमानतळासाठी पुरेशी विद्युत जोडणी देखील झालेले नाही. विमानतळाला पाणी पुरवठा करण्याचे काम देखील अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्ती देखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला अद्यापही परवानगी दिलेली नाही.

याबाबत माहिती देताना भाजप खासदार राजीव प्रताप रूढी आणि शिवसेना खासदार विनायक राऊत.

हेही वाचा -मुंबईत कोरोनाच्या प्रतिंबधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू

अलायन्स एअरलाइन कंपनीचा तिकीट काउंटर सुरू -

या विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचे तिकीट काउंटरदेखील विमानतळावर सुरू झाले आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर विमानतळ सुरू करण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण देखील रंगलेले पाहायला मिळत आहे.

समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार -

दरम्यान, आज जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. डीजीसीआयचे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे.

Last Updated : Mar 1, 2021, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details