सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी यायला सुरुवात झाली आहे. त्यांची कोरोनाची तपासणी करतेवेळी विलगीकरणाचा हातावर शिक्का मारून त्यांना शाळांमध्येच वेगळे ठेवले जाते. मात्र, विलगीकरणाचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणी हातावर जंतुसंसर्ग झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. यामुळे विलगीकरण झालेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरे देवा..! चाकरमान्यांना गृह विलगीकरणाच्या शिक्क्याच्या शाईतून जंतुसंसर्ग - विलगीकरणाच्या शिक्क्याच्या शाईतून जंतुसंसर्ग
जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्तींना गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला आहे. 'जंतुसंसर्ग झाल्यानंतर त्यावर लगेच ईलाज सुद्धा केला गेला नाही. त्यामुळे अजून काही जंतुसंसर्ग झाल्यास याला जबाबदार कोण राहील? तसेच शाई खराब होती तर त्या शाईने होम विलगीकरणाचा शिक्का का मारला', असा सवाल या लोकांनी केला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्तींना गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला आहे. त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडून त्यांना ही माहिती मिळाली आहे. 'जंतुसंसर्ग झाल्यानंतर त्यावर लगेच ईलाज सुद्धा केला गेला नाही. त्यामुळे अजून काही जंतुसंसर्ग झाल्यास याला जबाबदार कोण राहील? तसेच शाई खराब होती तर त्या शाईने होम विलगीकरणाचा शिक्का का मारला? ज्या ठिकाणी विलगीकरण केले गेले आहे, त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. लाईट, फॅनची सुद्धा सोय नाही. लहान मुले असल्याने सर्वच गैरसोय होत आहे. जेवण वगैरे गावातील घराकडील लोक देत आहेत. ते लोक वारंवार आमच्या संपर्कात येत असल्याने आमच्यामुळे त्यांना कोविड-१९ ची लागण होणार नाहीत ना? असे प्रश्न निर्माण झाले आहेत,' असे या लोकांचे म्हणणे आहे.
यातील अनेक लोक मुंबईसारख्या हॉटस्पॉट भागातून आले आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये ठेवले जात आहे. त्यांच्या गावातील लोक त्यांच्या संपर्कात येत आहेत. विलगीकरण करण्याचा मुख्य उद्देश लोकांपासून दूर ठेवणे हा आहे. मग सध्या होत असलेल्या संपर्कात येत आहेत. मग कोरोनाची लागण गावात मोठ्या प्रमाणावर पसरू शकते, अशी भीती जिल्ह्यातील लोक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने विलगीकरण केलेल्या लोकांना जेवणाची व्यवस्था करायची आहे, असे पालकमंत्री उदय सामंत एकीकडे म्हणतात. मात्र तशी तजवीज केली जात नाही. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि प्रशासनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, असे जिल्हावासियांनी सांगितले.