सिंधुदुर्ग -झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा उपक्रम जिल्ह्यातील गावागावामध्ये पोहोचविण्यासाठी ब्रि. सुधीर सावंत यांनी कृषी प्रतिष्ठानद्वारे शासनाला प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाला चार दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. नववी राज्य स्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद , महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे नववी राज्य स्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या परिषदेला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. केसरकर यांनी कृषी प्रतिष्ठानची नैसर्गिक शेतीची नोडल संस्था म्हणून घोषणा केली. यावेळी पालकमंत्रांच्या हस्ते नैसर्गिक शेतीच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.