सिंधुदुर्ग - जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारी भागातील अनेक गावांमध्ये आजही विजेचा प्रश्न आहे. तर, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत समुद्राचे पाणी गेल्याने लोकांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. यातच आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मालवण तालुक्यातील देवबाग गावातील एका नागरिकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. या नागरिकाने चक्क रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची रिकामी भांडी ठेवत मंत्रिमहोदयांचा दौरा अडवला आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
प्रतिक्रिया देताना रुक्मांगत मुणगेकर आणि जेष्ठ नागरिक हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या.. एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता
पोलीस अधीक्षक यांनी स्वतः गाडीतून उतरून रस्ता मोकळा केला
तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यातील देवबागमध्ये आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री आणि पुढारी गावात येतात, पण ग्रामस्थांच्या व्यथा वेदना समजून घेत नसल्याने येथील एका संतप्त ग्रामस्थाने देवबागच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्यासमोर पाण्याच्या रिकाम्या घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यामुळे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्वतः गाडीतून उतरून रस्ता मोकळा केला.
घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवला
तौक्ते चक्रीवादळानंतर मालवण तालुक्यातील देवबागमध्ये आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी खारे बनले असूनही येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. या ठिकाणी मंत्री आणि पुढारी येतात, पण ग्रामस्थांच्या व्यथा वेदना समजून घेत नसल्याने येथील रुक्मांगत मुणगेकर या ग्रामस्थाने आज देवबागच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्यासमोर पाण्याच्या रिकाम्या घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवला.
पोलीस प्रशासनाची तारांबळ
रस्ता रोखल्याने मंत्री गाडीतून उतरून आपले प्रश्न जाणून घेतील, अशी अपेक्षा रुक्मांगत मुणगेकर यांना होती. मात्र, अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यामुळे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्वतः गाडीतून उतरून मुणगेकर यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला. यानंतर रुक्मांगत मुणगेकर यांचे म्हणणे ऐकून न घेता मंत्री वडेट्टीवार येथून मार्गस्थ झाले. गावात आठ दिवस पाणी नाही, त्यामुळे मंत्र्यांनी निदान आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया रुक्मांगत मुणगेकर यांनी दिली. गावात आठ दिवस पाणी नाही, मग आम्ही करायचे काय ? असा सवाल यावेळी मुणगेकर यांनी यावेळी केला. तर स्थानिक नागरिकांनीही मंत्र्यांच्या या व्यथा जाणून न घेण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू