सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग येथील नादुरुस्त बनलेला ख्रिश्चनवाडी बंधारा अखेर समुद्रात वाहून गेला. समुद्री लाटा थेट येथील वस्तीत घुसत असल्यामुळे तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापुढे समुद्राला उधाण आले तर देवबाग ख्रिश्चनवाडीत वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता असल्याने नागरिकांची सध्या झोप उडालेली आहे.
मुसळधार पावसाने देवबागातील ख्रिश्चनवाडी बंधारा गेला वाहून; नागरिक दहशतीत - उधाण
सिंधुदुर्गात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे समुद्राला देखील उधाण आले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत.
मुसळधार पावसाने देवबागातील ख्रिश्चनवाडी बंधारा वाहून गेला.
सिंधुदुर्गात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे समुद्राला देखील उधाण आले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. किनाऱ्यावर त्याचा जोरदार मारा सुरू आहे. तेथून जवळ असलेल्या ख्रिश्चनवाडीत २० घरे आहेत. त्यांना यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशी भीतीच्या छायेत आहेत.