सिंधुदुर्ग -अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात आज मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळवले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी तत्काळ परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरुवात; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा - Sindhudurg Cyclone News
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी तत्काळ परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. विशेषत: किनारी गावांतील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सतर्क रहावे. संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी, विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.