सिंधुदुर्ग- जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तळकोकणात मुसळधार पाऊस; माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली, २७ गावांचा संपर्क तुटला - Kudal Sindhudurg
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओसांडून वाहणाऱ्या नदीचे दृश्य
तिलारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे माणगाव आंबेरी पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेरी पुलावरून वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.