महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात संततधार पावसाने हाहाकार, करुळ घाटात रस्ता खचला - सिंधुदुर्ग पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथे बाजारपेठेत पाणी भरले आहे तर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खचला आहे. दोडामार्गमध्ये पुराच्या पाण्यात मालवाहक गाडी फसल्याची घटनाही घडली आहे.

Heavy rain in Sindhudurg
Heavy rain in Sindhudurg

By

Published : Jul 12, 2021, 4:52 PM IST

Updated : Jul 12, 2021, 5:01 PM IST

सिंधुदुर्ग -जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथे बाजारपेठेत पाणी भरले आहे तर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खचला आहे. दोडामार्गमध्ये पुराच्या पाण्यात मालवाहक गाडी फसल्याची घटनाही घडली आहे.

करुळ घाटात रस्ता खचला -

गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा घसरल्याने रस्त्याचा भाग खचला आहे. सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे घाटात दरड कोसळण्याची देखील दाट शक्यता आहे. सध्या रस्त्याचा भाग खचल्याने करूळ घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या सहकार्यांसह करुळ घाटातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सिंधुदुर्गात संततधार पावसाने हाहाकार
शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी -
कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे शुकनदीचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठमधून बंदरवाडी व सम्यकनगरकडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले आहे. मुंबई–गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता खारेपाटण हायस्कुल रोड ते खारेपाटण बसस्थानक रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. तर खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्णत: बुडाला आहे.
सिंधुदुर्गात संततधार पावसाने हाहाकार
भेडशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बोलेरो पिकअप -
दोडामार्ग तालुक्यातील भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप चालकाची गाडी येथील नदीला आलेल्या पाण्यात अडकली. पाणी गाडीच्या बॉनेट पर्यंत गेल्याने गाडी पाण्यातच अडकून पडली आहे. ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला जात होता. तर पाणी नजीकच्या ख्रिश्चन सामाजाच्या दफनभूमीपर्यंत भरले होते. या भागातील शेतीचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे.
आंबोलीत दोन दिवसात पावसाचे शतक -
आंबोली हिल स्टेशनवर गेले दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान यावर्षी आतापर्यंत १०५ इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील नदी-नाले सुद्धा तुडुंब भरून वाहू लागले आहेत. आंबोलीत जून महिन्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे शतक पूर्ण होवून १० ते १२ दिवसात दुसरे शतक देखील पूर्ण होते. मात्र यावर्षी विश्रांती नंतर पाऊस आला आहे. गेले काही दिवस पावसाने मुसंडी मारली होती. त्यामुळे यावर्षी सद्यस्थितीत १०५ इंच पाऊस झाला आहे. दरवर्षी तो ७५०० मी.मी च्या म्हणजे ३०० इंचाच्या पुढे असतो.
Last Updated : Jul 12, 2021, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details