महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळकोकणात मुसळधार पाऊस, पेरणीला सुरुवात

मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच तळकोकणात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली आहे.

तळकोकणात मुसळधार पाऊस

By

Published : Jun 27, 2019, 7:42 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली होती. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला, तर वेंगुर्ले, देवगड, वैभववाडीत दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

तळकोकणात मुसळधार पाऊस

मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच तळकोकणात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे आता पेरणीच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला महामार्ग काही ठिकाणी चिखलमय झाला. परिणामी वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील पावसाची सरासरी -

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३२.६५ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. तसेच १ जूनपासून आतापर्यंत ४०४.५५ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.

तालुकापाऊस (मि.मी.)

  1. दोडामार्ग ५८ मिमी
  2. सावंतवाडी १५ मिमी
  3. वेंगुर्ला ४४.२ मिमी
  4. कुडाळ १७ मिमी
  5. मालवण ६१ मिमी
  6. देवगड २० मिमी
  7. कणकवली २४ मिमी
  8. वैभवाडी ४० मिमी

ABOUT THE AUTHOR

...view details